Mumbai Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी. मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Election) कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) सध्या पालिकेवर ठाकरे गटाची सत्ता आहे. या सत्तेला हादरा देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी शिंदे गटाकडून (Eknath Shinde Group) 12 जणांवर मुंबईची जबाबदारी दिली आहे.


राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाची जोरदार तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुंबई महानगर पालिका क्षेत्राची संघटनात्मक कार्याची जबाबदारी जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणूक पाहता बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गटाची ) हालचाली सुरु झाली आहे. याबाबत मंत्रालय समोरील बाळासाहेब भवन येथे बैठक घेऊन जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयारी सुरु केली आहे हे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील संघटना मजूबत करण्यासाठी 12 जणांची विशेष टीम तयार केली आहे. या टीममध्ये खासदार, आमदारांसह माजी नगरसेवकांचाही समावेश करण्यात आला आहे. यात तीन महिला नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे.


शिंदे गटाकडून या 12 जणांवर मुंबईची जबाबदारी 


या 12 जणांमध्ये खासदार गजानन किर्तीकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार, प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार दिलीप लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, उपनेत्या शीतल म्हात्रे, आशा मामिडी आणि माजी नगरसेविका शेवाळे यांचा समावेश आहे. 


 ठाकरे गटाच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी 


दरम्यान, मुंबई महापालिका प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिका प्रभागांची पुनर्रचना करत 227 वरून 236 प्रभाग केले.  शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी याला स्थगिती देत प्रभागांची संख्या पुन्हा 227 केली होती. त्याला ठाकरे गटाच्या राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यामुळे काय निकाल येार याचीच उत्सुकता आहे.