मुंबई : सायन येथे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद कांबळे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला साथ दिली होती. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे वॉर्ड नंबर १७३ च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेत. त्यामुळे शिवसेनेला गड राखण्यात यश आले आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झाली होती.


काँग्रेस उमेदवाराला टक्कर देत सेनेचे उमेदवार विजयी झालेत. भाजपनेही या निवडणुकीत शिवसेनेला केली होती. मदत वॉर्ड १७३ पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे यांना एकूण मते ६६१६ मते मिळालीत तर काँग्रेसचे सुनील शेट्ये यांना एकूण मते ५७७१ मते, अपक्ष उमेदवार  गौतम झेंडे  यांना ५४९ मते मिळाती.  नोटाचा २३४ जणांनी वापर केला. शिवसेनेचा उमेदवार ८४६ मतांनी विजयी झाला.