Mumbai News : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असताना आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या असतानाच इथं मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बदलीचे निर्देश आले आणि या निवडणुकीच्या माहोलालला एक वेगळं वळण मिळालं. तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ झाल्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्तांना पदावरून दूर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले. ज्यानंतर आता शहरात नव्या आयुक्तपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार याचीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहून काम करण्याची अपेक्षा नव्या आयुक्तांकडून असणार आहे. सध्याच्या घडीला चहल यांच्या जागेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत आहेत. गगराणी यांच्या नवाची तुलनेनं अधिक चर्चा होत असल्यामुळं आता मुंबई शहराच्या महानगरपालिका आयुक्तपदी त्यांची खरंच वर्णी लागते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : बापरे! मुंबईचं तापमान इतकं वाढणार? राज्यातील 'या' भागांवर गारपीटीसह पावसाचं संकट  


 


मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राहिलेल्या चहल यांच्या कामांवर एक नजर 


महाविकासआघाडी सत्तेत असताना इक्बालसिंह चहल आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेकदा काम करताना दिसले. राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी एकनाथ शिंदे अर्थात राजच्याच्या मुख्यमंत्र्यांशी चांगलं नातं ठेवत त्यांच्यासोबत काम केलं. स्वच्छ मुंबई मोहिमेसाठीही चहल यांनी मोलाचं योगदान दिलं, किंबहुना अद्यापही ते या कामात हिरीरिनं पुढाकार घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई रेसकोर्सच्या जागेच्या करारामध्ये चहल यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 


कोरोना काळात  तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी तडकाफडकी चहल यांची नियुक्ती करण्यात आली होती. चहल यांच्या या कार्यकाळामध्ये त्यांच्यापुढं अडचणीचे प्रसंगही आले. कोरोना काळात करण्यात आलेल्या खरेदी प्रकरणी पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं. चहल मात्र या कचाट्यात सापडले नव्हते. 


दरम्यान, सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना करण्यात आलेल्या निधीवाटपावरून चहल यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. इतकंच नव्हे, तर पालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती झालेले मंगलप्रभात लोढा आणि केसरकर यांच्या कलानं त्यांचं झुकतं माप असतं अशीही टीकेची झोड त्यांच्यावर उठवण्यात 
आली होती.