Mumbai News : मुंबईचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मागील काही वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी हाती घेतलं आणि त्यानुसार कामंही सुरु केली. राज्यात सत्तांतरं झाली तरीही ही विकासकामं मात्र कुठं थांबली नाहीत. उलटपक्षी या विकासकामांची वेगानं पूर्तता झाली. अशा या विकासकामांच्या गर्दीतून वाट काढत अखेर शहरातील नागरिकांच्या सेवेत येण्यात यशस्वी ठरला तो म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या या सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. (Mumbai- Navi Mumbai) मुंबई आणि नवी मुंबई असं अंतर मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या सागरी सेतूवरून आतापर्यंत लाखो वाहनांनी प्रवासही केला. पण, शहरातील काही नागरिकांना अद्यापही या सागरी सेतूवरील प्रवासाचा योग आलेला नाही. येत्या काळात या मंडळींना हा योगही अगदी लवकरच अनुभवता येणार आहे. कारण, सागरी सेतूवरून चक्क सार्वजनिक वाहतुक सुरू केली जाण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.


कसा असेल प्रवासमार्ग? 


Mumbai Trans Harbour Link (MTHL) अर्थात अटल सेतूवरून बेस्टची S-145 क्रमांकाची बस प्रवास करणार आहे. चलो अॅपवरही यासंदर्भातील माहिती उपलब्ध असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार S-145 ही बस (Konkan Bhavan) कोकण भवन, बेलापूरपासून वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंतचा प्रवास करणार असून, अटल सेतूवरुन या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा प्रवाशांना अनुभवता येणार आहे. साई संगम तारघर- उलवे नोड- आई तरुमाता- कामधेनू ओकलँड्स- एमटीएचएल- इस्टर्न फ्रीवे- सीएसएमटी- चर्चगेट स्थानक आणि कफ परेड अशा मार्गानं ही बस प्रवास करेल. 


प्राथमिक स्वरुपातील माहितीनुसार सुरुवातीला या बसच्या दोन फेऱ्या असतील. ज्यामध्ये पहिली फेरी सकाळच्या वेळेत बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान असेल आणि दुसरी फेरी सायंकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूरदरम्यान असेल. बेस्टकडून या प्रवासासाठीची चाचणीफेरीसुद्धा पार पडली आहे. ज्यानंतर आता उत्तमोत्तम प्रवासमार्ग आणि बसभाडं यावर बेस्टच्या वतीनं विचार विनिमय सुरु असल्याचं कळत आहे. 


हेसुद्धा वाचा : राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात तासातासाला बदलणार हवामान 


अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं भारताच्या शिरपेचात नानाचा तुरा खोवला गेला आहे. सहा पदली ट्रान्स हार्बर लिंक म्हणून नावारुपास आलेल्या या सागरी सेतूमुळं मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमध्ये असणारं अंतर कमी झालं आहे. तब्बस 21.8 किमीच्या या सागरी सेतूचा 16.5 किमी इतका भाग समुद्र पृष्ठावर असून, या संपूर्ण सेतूच्या उभारणीसाठी तब्बल 17840 कोटी रुपये इतका खर्च आला होता. या सागरी सेतूमुळं तास- दीडतासांचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये सहज शक्य होत आहे.