आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत
Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
Mumbai Coastal Road : मागील काही वर्षांपासून मुंबई शहरात सुरू असणारे अनेक प्रकल्प आता पूर्णत्वास गेले असून, काही प्रकल्पांचं लोकार्पणही करण्यात आलं आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईतील सागरी किनारा मार्ग, अर्थात कोस्टल रोड. (Mumbai News)
मुंबईतील कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक वाहनधारकांनी प्रवासासाठी याच मार्गाची प्राधान्यानं निवड केली. ज्यानंतर आता याच मार्गातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला (Bansra Worli Sea Link) जोडणाऱ्या मार्गिकेचंही उद्धाटन आणि लोकार्पण 12 सप्टेंबर (आज) होणात आहे. ज्यामुळं आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास सागरी किनारा मार्ग व्हाया सी लिंक अवघ्या 12 मिनिटांमध्ये शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...
गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचं उद्घाटन करणार असून, त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या नव्या मार्गामुळे मरीन ड्राइव्हवरून वांद्र्यापर्यंतचा प्रवास फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार असून, या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधनासह 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या कोस्टल रोडचं 90 टक्के काम पूर्ण झालं असून, हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे.
कोणाला होणार फायदा?
सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू या प्रकल्पांमुळे लवकरच शहरातील वाहनचालकांना मरीन ड्राइव्हवरून वांद्रयापर्यंत किमान वेळेत जाता येणार आहे. ज्यामुळं दक्षिम मुंबईतून वांद्रे गाठणं अधिक सोपं आणि सुकर होणार आहे. मुख्य म्हणजे या वाटेवर एकही सिग्नल नसल्यामुळं हा प्रवास वेगवान होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक जोडणं हे तसं आव्हानाचं काम होतं. पण, अखेर हा मार्ग महाकाय गर्डरनं जोडला गेला होता. इथं 136 मीटरचा पट्टा सर्वांत मोठ्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरनं जोडण्यात आला. या गर्डरचं वजन दोन हजार मेट्रिक टन इतकं असल्याचं सांगितलं जात आहे.