बेडवर पत्नीचा मृतदेह, तर पती... कांदिवलीत वृद्ध दाम्पत्यासोबत नेमकं काय घडलं?
Crime News In Marathi: कांदिवलीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जोडप्याचा मृतदेह राहत्या घरात आढळला आहे.
Crime News In Marathi: कांदिवली येथे वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीला मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे तर, पत्नीचा मृतदेह पलंगावर आढळलेला दिसला.समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पतीचे नाव प्रमोद चोणकर तर त्याच्या पत्नीचे नाव अर्पिता चोणकर असल्याची ओळख पटली आहे. प्रमोदचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे कर, अर्पिता यांचा मृतदेह पलंगावर आढळला होता. दोघांचाही मृदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांना दोघांच्याही मृत्यूचे नेमकं कारण काय? हे शोधणं मोठं आव्हान आहे. पतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद यांनी आत्महत्या केली असू शकते. मात्र, अर्पिताचा मृत्यू कसा झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 13 मे रोजी ही घटना घडली आहे. तर, 16 मे रोजी हे प्रकरण उजेडात आले आहे. शेजाऱ्यांना चोणकर यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तोपर्यंत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. समता नगर पोलिसांनी एडीआर दाखल करत या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
पोलिसांच्या मते, कांदिवली पूर्व येथील आर्य चाणक्य नगर येथे चोणकर दाम्पती राहत होते. त्यांना कोणतेही मुलबाळ नव्हते. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटदेखील सापडली आहे. प्रमोद यांनीच ही सुसाइड नोट लिहली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या नोटमध्ये लिहल्याप्रमाणे चोणकर दाम्पत्याची आर्थिक स्थिती खालावली होती आणि मानसिक रित्या ते आजारी होते. सुसाईड नोटवर 14 मे रोजी ही तारिख लिहली आहे. त्यामुळं त्यांनी त्या दिवशीच आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले गेले आहे. त्यानुसार, प्रमोद यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अर्पिताचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत मात्र अद्याप स्पष्ट काही कळू शकलेले नाहीये. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अर्पिता यांच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे. अर्पिताचा मृत्यू विषप्रयोगामुळंही झाला असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.