मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : (Ghatkopar Hoarding Accident) काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये (Mumbai News) वादळी वारे आणि पावसानं थैमान घातलेलं असतानाच शहरातील घाटकोपर भागामध्ये होर्डिंग कोसळून आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी घेतला. या दुर्घटनेनंतर सदर प्रकरणाला वेगली वळणं मिळाली आणि यातूनच चौकशीच्या मागणीनं जोर धरला. मरण खरंच इतकं स्वस्त आहे का? असा उद्विग्न प्रश्न नागरिकांमधून सातत्यानं विचारला जात असताना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तातडीनं शासकीय सूत्रही चाळवण्यात आली आणि आता याच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तपासादरम्यान भावेश भिंडेच्या कार्यलयातून कागदपत्र जप्त करण्यात आली असून पुढे तपास सुरुच आहे. या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-७ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात भावेश भिंडेची आर्थिक बाजू तपासली जात असून, त्यास परवानगी कोणी दिली याचाही तपास सुरु आहे. भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा? 


मृतांचा आकडा वाढला 


दरम्यान, बुधवारी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून आता 17 वर पोहोचला आहे. 13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपजवळ असलेला मोठा होर्डिंग्ज वादळामुळे कोसळला यात अनेक वाहनांचं नुकसान झालं आणि नागरिकांचाही अकाली मृत्यू यामुळं ओढावला होता. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. ज्यानंतर मृतांमध्ये आणखी एखाची भर पडली आहे. ज्यामुळं मृतांचा आकडा आता 17 झाला आहे. परळ, येथील केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राजु मारूती सोनावणे या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अजुनही या दुर्घटनेतील चार रुग्णांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.