Mumbai News : मुंबईत येत्या काळात अनेक नव्या इमारती आणि नवी बांधकामं उभी राहणार असून शहराचं वेगळं रुप अवघ्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळणार आहे. पण, त्यापूर्वी मात्र या शहराला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याच निर्णयांमधील एका निर्णयाचा फटका मुंबईत नवं घर घेऊ पाहणाऱ्यांनाही बसणार आहे. कारण, Under Construction बिल्डींगमध्ये घर घेणाऱ्यांची प्रतीक्षा आता वाढणार आहे. 


शहरातील वाढत्या प्रदूषणामुळं मोठा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मागील काही दिवसांपासून प्रदुषणाच्या पातळीत अतिशय चिंताजनकरित्या वाढ झाल्यामुळं आता यंत्रणांनीही हे संकट थोपवून धरण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. खुद्द महानगरपालिका आयुक्त इक्लाल सिंह चहल यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं असून, आता शहरात सुरु असणाऱ्या बांधकामं प्रकल्पांवर जिथंजिथं धूळ आणि प्रदुषण नियंत्रणासाठीचे उपाय योजले जात नाहीत तिथं सरसकट बांधकामांवरच बंदी आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 


शहरात सध्याच्या घडीला खासगी आणि सरकारी अशा अख्त्यारित येणारी अनेक बांधकामं सुरु आहेत. पण, प्रदूषणाच्या दृष्टीनं संरक्षणात्मक पावलं उचचली न जाणाऱ्या बांधकामांवर कारवाई करत असताना मात्र यामध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. खुद्द पालिका आयुक्तांनीच अशा सूचना एका बैठकीत दिल्या. या धर्तीवर आता सोमवारपर्यंत धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. 


महापालिकेकडून देण्यात आलेल्या सूचना.... 


  • बांधकामाच्या ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा आवश्यक.

  • बांधकाम पूर्णत: झाकलेलेच असावे. जुनं बांधकाम पाडतानाही आच्छादन करावं.

  • प्रदूषणाला कारणीभूत बांधकामाच्या ठिकाणी 15 दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (अँटी स्मॉग मशिन) बसवण्याच यावीत. 

  • मेट्रो, रस्ते, उड्डाणपूलांवर 35 फूट उंचीच्या आच्छादनांसह स्प्रिंकलर आणि अँटी स्मॉग गनची व्यवस्था असावी. 

  • कामगारांना मास्क, चष्मा असे साहित्य दिले जावे. 

  • बांधकाम साहित्य, डेब्रिज नेणारे वाहन झाकलेले असावे. मर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय 


इतकंच नव्हे, तर बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून वाहनांच्या चाकांची प्रत्येक पेरीनंतर स्वच्छता केली जाते की नाही, याची तपासणी केली जाणं आवश्यक असल्याचं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 


वरील मार्गदर्शक सूचनांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी पालिकेकजून 24 वॉर्डमध्ये किमान 50 पथकं तैनात ठेवण्यात येणार आहेत. शिवाय उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्यास जागेवरच काम थांबविण्याची नोटीस देण्यात येणार आहे. प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्या वाहनांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.