Mumbai Local : प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलनं आजवर अनेक नागरिकांना विविध ठिकाणी नेलं आहे. 'रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास' असंच ब्रीदवाक्य नागरिक या रेल्वेवर असणाऱ्या विश्वासापोटी बोलताना दिसतात. अशा या विश्वासार्ह रेल्वेनं पुन्हा एकदा प्रवाशांच्या हिताचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


मुंबई लोकलनं प्रवास करण्याऱ्यांसाठी खास सुविधा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वे (Western Raiway) विभागाकडून येत्या काळात प्रवाशांसाठी  ‘Yatri App’ सुरु करण्यात येणार आहे. 5 एप्रिलपासून या अॅपचा वापर असंख्य प्रवासी अगदी सहजपणे करु शकणार आहेत. अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रवाशांना या अॅपच्या माध्यमातून रेल्वेचे लाईव्ह अपडेट्स (Live Updates), announcements, नवी वेळापत्रकं, बहुतांश रेल्वे स्थानकांचे नकाशे (Maps) आणि तिथं असणाऱ्या सुविधा अशी सर्व माहिती असणार आहे. (Indian Railway Announces Yatri App For Live Tracking Of Mumbai Local Trains read details )


हेसुद्धा वाचा : Investigation Report : शिधा गरिबांना, मलिदा ठेकेदारांना! शिधाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट


 


यात्रा अॅपमध्ये रेल्वे स्थानकांच्या नजीकची प्रेक्षणीय स्थळं, मुंबई मेट्रो (Mumbai Metro) आणि बस वेळापत्रक अशीही माहिती मिळू शकणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अॅप एकाच ठिकाणी प्रवाशांना बरीच माहिती देणार असल्यामुळं त्यांना एका क्षणात प्रवासाची आखणी करता येणार आहे. 


काय आहेत या अॅपची आणखी वैशिष्ट्यं?


रेल्वेच्या Live Location शिवाय या अॅपच्या माध्यमातून इतरही बरीच माहिती मिळणार आहे. 
-  Live Location शिवाय अॅपमध्ये लोकेशनचा नकाशाही दिसणार आहे. जिथं प्रवासी रेल्वे एका चिन्हाच्या स्वरुपात पुढे जाता पाहू शकतील. 
- यात्री अॅपच्या माध्यमातून इतर रेल्वेंचा प्रवास कुठंही, कधीही पाहता येणार आहे. 
- अवघ्या 15 सेकंदांमध्ये हे अॅप तुम्हाला अपडेट्स देणार आहे. 
- तुम्ही नेमके कोणत्या रेल्वे स्थानकावर आहात हेसुद्धा या अॅपच्या माध्यमातून कळणार आहे. 


महत्त्वाचं म्हणजे यात्री अॅप दिव्यांगजनही अगदी सहजपणे वापरु शकणार आहेत. आवाजाच्या आधारे मोबाईल वापरणाऱ्या दिव्यांगजनांनाही या अॅपमधून Google Assistant च्या सहाय्यानं अपेक्षित लोकलची माहिती मिळणार आहे. इथं फक्त त्यांना  “Talk to Yatri Railways” अशी कमांड द्यावी लागणार आहे. 


कसं डाऊनलोड कराल अॅप? 


अँड्रॉईड युजर्स हे अॅप Google Play Store वरून डाऊनलोड करू शकतात. तर, अॅपल युजर्स Apple App Store वरून सहजपणे अॅप डाऊनलोड करू शकतात. अॅपमध्ये असणारे अनेक बारकावे ते वापरताना तुम्हाला सहजपणे लक्षात येतील.