Mumbai Monsoon News : उन्हाचा दाह वाढत असतानाच मुंबईसह देशातील बहुतांश भागांना आता अवकाळी नव्हे, तर मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षी मान्सून नेमका कधी येणार आणि तो पुढं किती दिवस इथं स्थिरावणार हाच प्रश्न अनेकांना पडत असताना आयएमडीनं या प्रश्नाचं उत्तर दिलं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात असून, मान्सूनदरम्यान शहरात उदभवणाऱ्य़ा समस्य़ांच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन विभागानंही काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMC च्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते जून ते सप्टेंबर या ऐन मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये शहरातील समुद्र किनारपट्टी भागाला तब्बल 22 दिवस हाय टाईडचा धोका असणार आहे. यादरम्यान, शहरातील समुद्रात मोठाल्या लाटा उसळणार असून, किनारा ओलांडून पाणी शहरातील रस्त्यांवर येण्याची शक्यता वर्तवत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. साधारण 4 मीटरहून उंच लाटा उसळणार असल्यामुळं नागरिकांनी नेमकं कोणत्या दिवशी सावध व्हावं, यासंबंधीचा इशारासुद्धा हवामान विभागानं दिला आहे. 


जून ते सप्टेंबर महिन्यातील हाय टाईडचे दिवस... 


जून / अंदाजे लाटांची उंची 
5 जून- 11: 17 वाजता - 4.61 मीटर
6 जून -12 : 05 वाजता - 4. 69 मीटर
7 जून - 12 : 50 वाजता - 4 . 67 मीटर
8 जून - 01 : 34 वाजता - 4. 58 मीटर
23 जून - 01: 09 वाजता - 4. 51 मीटर
24 जून- 01: 53 वाजता - 4. 54 मीटर
25 जून - 02 : 36 वाजता - 4.53 मीटर


जुलै महिन्यातील अंदाजे लाटांची उंची 
22 जुलै - 12 : 50 वाजता - 4 .59 मीटर
23 जुलै - 01: 29 वाजता - 4.69 मीटर
24 जुलै - 02: 11 वाजता - 4. 72 मीटर
25 जुलै - 02 :51 वाजता - 4.64 मीटर


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकट 


ऑगस्टमध्ये कधी असेल हाय टाईड?
19 ऑगस्ट- 11 :45 वाजता - 4. 51 मीटर
20 ऑगस्ट- 12 : 22 वाजता - 4. 70 मीटर
21 ऑगस्ट- 12: 57 वाजता - 4. 81 मीटर
22 ऑगस्ट- 01: 35 वाजता - 4. 80 मीटर
23 ऑगस्ट- 02 :15 वाजता - 4. 65 मीटर


सप्टेंबरपर्यंत सावट कायम... 
17 सप्टेंबर- 11 :14 वाजता - 4. 54 मीटर
18 सप्टेंबर- 11 : 50 वाजता - 4. 72 मीटर
19 सप्टेंबर- 12: 19 वाजता - 4.69 मीटर
20 सप्टेंबर- 1:03 वाजता - 4. 84 मीटर
21 सप्टेंबर- 01 : 42 वाजता - 4. 50 मीटर
22 सप्टेंबर- 02.33 वाजता - 4. 64 मीटर


जून महिन्याच्या सुरुवातीपासून अगदी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत समुद्र खवळलेलाच असेल त्यामुळं, नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.