मुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, `डी कंपनी`शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. बनावट नोटांप्रकरणी कारवाई करताना बुधवारी टाकलेल्या छाप्यात संशयितांच्या अनेक मालमत्तांवर छापे टाकले. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे. दरम्यान, डी कंपनीची नेमकी भूमिका तपासात आढळून आली होती.
बनावट नोटा प्रकरणाचा संबंध 'डी कंपनी'शी
2021 च्या नौपाडा प्रकरणात मुंबईतील सहा ठिकाणी केलेल्या झडतीदरम्यान मोठ्याप्रमाणात बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच साहित्य जप्त केले आहे, असे एजन्सीने गुरुवारी सांगितले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोव्हेंबर 2021 मध्ये 2.98 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, भारतात बनावट नोटांच्या चलनात 'डी कंपनी'ची भूमिका प्रथमदर्शनी समोर आली आहे, असे एनआयएने गुरुवारी एका निवेदनात तसे म्हटले आहे.
डी-कंपनी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, फरारी डॉन दाऊद इब्राहिम याची लिंक या प्रकरणाशी असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण 2,000 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त करण्याशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली होती. 18 नोव्हेंबर 2021 रोजी ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. रियाझ आणि नासीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
NIA छापेमारीत हे साहित्य जप्त
या छापेमारीत धारधार शस्त्र, डिजिटल साहित्य आणि काही कागदपत्रांचा समावेश आहे. हे साहित्य बनावट चलन बनविण्यात येत होते. याचा संबंध डी कंपनीशी थेट असल्याचे समोर आले आहे. NIA च्या तपासातील निष्कर्षांमुळे या प्रकरणाला दुजोरा मिळाला आहे. जप्त केलेल्या वस्तुंवरुन हे स्पष्ट होते की, बनावट नोटांच्या रॅकेटचा डी कंपनीशी थेट संबंध होता. हे संपूर्ण प्रकरण भारतातील 2000 च्या बनावट नोटांशी संबंधित आहे.