Coastal Road : कोस्टल रोड हा शब्द आता मुंबईकरांसाठी नवीन राहिलेला नाही. मात्र या प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झालं असून आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी कोस्टल रोडचा एक भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पाची एक बाजू खुली होण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोस्टल रोडच्या चौथ्या मार्गिकेवर बेस्ट बसचे एकूण आठ थांबे असणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार आहे. तसेच सुखाचा प्रवास, मोकळा श्वास असे घोषवाक्य असलेल्या कोस्टल रोडवर सुरक्षेलाही प्राधान्य देणात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 9 किलोमीटरचा चारपदरी मार्ग फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणार आहे. या मार्गावर ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने गाड्या धावणार आहेत. त्यामुळे वाहने, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोस्टल रोडवर एन्ट्री, एक्झिट आणि बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 व्हिडीओ इन्सिडंट डिटेक्शन सिस्टीम आणि भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर 80 आपत्कालीन फोन यंत्रणा उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि इंधन वाचवणाऱ्या कोस्टल रोडच्या दक्षिण मुंबईतून थेट वरळीत घेऊन येणारा, प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा 10.58 किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.


कोस्टल रोडवर बेस्ट बसचे थांबे


कोस्टल रोडवर वरळी सी लिंकप्रमाणे बेस्ट बसच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये चारचाकी वाहनांव्यतिरिक्त बेस्टच्या बसेसना परवानी देण्यात आली आहे. कोस्टल रोडवरील चौथी मार्गिका ही बेस्ट बस आणि आपत्कालीन वाहनांसाठी ठेवण्यात आली आहे. या एकूण मार्गावर 8 ते 10 बस थांबे ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे वाहने नाहीत अशा मुंबईकरांना बेस्टने प्रवास करुन थेट 7 आणि 8 किलोमीटर लांबीच्या सागरी पदपथावर पोहोचून आनंद घेता येणार आहे. 


कोस्टल रोडवर फक्त 12 तास वाहतुकीसाठी परवानगी


कोस्टल रोडवरील वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्यावरील मार्गावर वाहतूक सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 असे केवळ 12 तासच वाहतुकीला परवानगी असणार आहे. उरलेल्या वेळात कोस्टला रोडचे बाकीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासोबत एकूण कोस्टल रोड सुरु जून 2024 पर्यंतचा वेळ जाणार आहे. शिवडी नाव्हा शेवा सेतूचे शिवडी ते वरळीपर्यंत खांब उभारण्याचे काम सुरु असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.