Mumbai news : मुंबई विद्यापीठ आणि त्याभोवती असणारी वादाची झालर कायमच पाहायला मिळाली आहे. अनेकांना एका प्रतिष्ठीत शैक्षणिक उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या याच विद्यापीठाविषयीची चिंतेत टाकणारी आणि भुवया उंचावणारी बातमी समोर आली आहे. सध्याच्या घडीला मुंबई विद्यापीठ प्रशासनालाही खडबडून जाग आली असून, एका गंभीर प्रकरणामुळं विद्यापीठासंदर्भात काही चुकीची माहिती पसरवण्याचं काम सुरु असल्याची माहिती या गोंधळाच्या वातावरणात समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमाकून विद्यापीठाकडून पदवी, गुणपत्रिका 10 ते 12 हजार रुपयांत घरपोच पोहोचवल्या जातील आणि या साऱ्यासाठी अवघ्या एका दिवसाचाच कालावधी लागेल अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला असता, सदरील फोन करण्याऱ्या व्यक्तीकडे 2 हजार रुपयांची आगाऊ रक्कम माहगण्यात आली. ज्यानंतर बीएससी अभ्यासक्रमातील सहाव्या सत्राची गुणपत्रिका व्हॉट्सअपच्य़ा माध्यमातून पाठवण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : बापरे! भारताची लोकसंख्या दुपटीनं वाढणार, शारीरिक संबंधांच्या बाबतीत... धक्कादायक आकडेवारी समोर


मुंबई विद्यापीठानं यासंबंधी सविस्तर माहिती देत हे बनावट गुणपत्रिकेचं बिंग फोडलं. बीएससीच्या सहाव्या सत्राही ही गुणपत्रिका 6 एप्रिल 2024 या तारखेची असून, ती फोटोशॉप आणि इतर संगणकीय तंत्रांच्या मदतीनं तयार करण्यात आल्याचा खुलासा विद्यापीठाकडून करण्यात आला. याशिवाय अशा प्रकारची पदवी आणि गुणपत्रिका देणाऱ्या तोतयांपासून सावध राहत कोणत्याही प्रलोभननांना बळी न पडण्याचं आवाहन मुंबई विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलं.