मुंबई : मुंबईतील पवई परिसरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. मोमोज विकणाऱ्या दोन गटांमध्ये वादाला सुरुवात झाली आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्रीची घटना
काल रात्री अकराच्या सुमारास पवईतील शंकराचार्य मार्ग परिसरात हा प्रकार उघडकीस आला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हाणामारी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं.



परिसरातील नागरिक त्रस्त
याप्रकरणी पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून कारवाई केली आहे. या हाणामारीमुळे परिसरात राहणारे आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. गोंधळ घालणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.