Mumbai News : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वाढत्या उकाड्यामुळं नागरिक त्रस्त असतानाच आता त्यांच्यापुढे आणखी एक संकट उभं राहणार आहे. कारण, शहरातील महत्त्वाच्या भागात 22 ते 23 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अनेक कार्यालयं आणि रहिवासी भाग असणाऱ्या मुंबईतीत या भागातील नागरिक, सदनिकांना प्रशासनाच्या वतीनं पाणी जपून वापरण्याचं आणि पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, विले-पार्ले, गोरेगाव आणि ओशिवरासह नजीकच्या भाजागत 22 मे ते 23 मे दरम्यान 16 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. नव्यानं बसवण्यात आलेल्या 1500 मिमी व्यासाच्या आणि 1200 मिमी व्यासाच्या (पार्ले क्षेत्र) दोन महत्वाच्या जलवानहिनी जोडण्यासाठी म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या वतीनं घेण्यात आला आहे. बी डी सावंत रोड, सी जी रोडपासून पुढे सी जी रोड आणि अंधेरीतील सहार रोड पूर्व इथपर्यंतच्या टप्प्यामध्ये पालिकेकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे. 


22 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून पालिका कर्मचारी हे काम हाती घेणार असून, त्याच मध्यरात्रीनंतर 1 वाजता हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेकडून हे काम पूर्ण होताच वेरावली जलाशय 1, 2 आणि 3 मधील पाणीपातळी सुधारणार असून, त्याचा फायदा अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले भागाला होणार आहे. दरम्यान या संपूर्ण जोडणी काम सुरु असण्याच्या प्रक्रियेमुळं के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण भाग सर्वाधिक प्रभावित होणार असून, तेथील पाणीपुरवठा बंद राहील. 


हेसुद्धा वाचा : खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक


 


कोणकोणत्या भागांमधील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम? 


पी दक्षिण विभाग – बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) भाग (सायंकाळी 7 ते रात्री 9.30 दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा) राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी 7.45 ते रात्री 9.15)


के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी 7.30 ते दुपारी 12), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( सकाळी 9 ते सकाळी 11), जुहू-कोळीवाडा झोन, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी 11 ते दुपारी 1) एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – 2, के पश्चिम (पाणीपुरवठा बंद), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी 12.15 ते 2.10 चार बंगला झोनमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 ) 


मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.40), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री 9.30 ते रात्री 12), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री 10 ते मध्यरात्री 12.30)


 


के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, मातोश्री क्लब, दुर्गा नगर (सकाळी 8 ते 9), दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी 10 ते दुपारी 12), दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (सकाळी 9 ते सकाळी 11), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर (सकाळी 11 ते दुपारी 2), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी 1.30 ते दुपारी 3.40), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी 5 ते रात्री 8), पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी 5 ते रात्री 8) जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (रात्री 8 ते रात्री 10.30)