Mumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखला
Mumbai North Lok Sabha Election: उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना पराभूत केले आहे.
Mumbai North Lok Sabha Election: उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. पियूष गोयल यांनी २५४९५७ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला आहे. पियूष गोयल यांनी जवळपास एक लाखाच्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदारांची संख्या अधिक आहे. गेले दोन टर्म या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. यंदाही भाजपने हा मतदारसंघ राखला आहे. पीयूष गोयल हे स्थानिक उमेदवार नसल्याने काँग्रेसने प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, भूषण पाटील यांची उमेदवारी काँग्रेसने उशीराने जाहीर केल्याने त्यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला होता. त्याचा फटकाही काँग्रेसला बसला असेल. पीयूष गोयल हे भाजपच्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत त्यामुळं त्याचा फायदाही भाजपला झाला.
2019मध्ये काय घडलं?
2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शेट्टी यांना 7,06,678 मते मिळाली होती. काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवले होते. तर, 2014 मध्ये गोपाळ शेट्टी यांनी ते