मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या ओला उबेर चालकांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नाही. आज 11 व्या दिवशी ओला प्रशासनासोबत बैठक पार पडणार होती. मात्र संचालकच संघटनांच्या प्रतिनिधींना न भेटता निघून गेले. यामुळे शेवटची बैठकही फोल ठरली.


घरावर मोर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आक्रमक झालेल्या ओला उबेर चालकांच्या वतीने येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय न झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.


मंत्रालयात पडसाद 


अचानक सुरू केलेल्या संपामुळे नागरिकांचे देखील हाल होत आहे . चालकाचे दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांचे नुकसान होत आहे ओला उबर संपाचे पडसाद मंत्रालयात पडलेले पहायला मिळाले. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओला - उबेर चालकांनी सुमारे 10 मिनिटं गाड्या पार्क करत आंदोलन केलं. पोलिसांनी गाड्या हटवून प्रवेशद्वार अखेर मोकळं केलं.


परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यामातून या ओला-उबर चालकांनी केलं. दरम्यान रावतेंनी हस्तक्षेप करावा,  सरकारनं न्याय द्यावा तसंच या प्रकरणात सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी या आंदोलकांची आहे.