मुंबईत दोन कारमध्ये जोरदार टक्कर, एका पोलिसाचा मृत्यू
...
मुंबई : मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे. दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली आहे. दोन गाड्यांमध्ये झालेल्या या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर, इतर तीन जण जखमी झाले आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.