मुलुंड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले, लोकल उशिराने
मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं. त्यामुळे कल्याणच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पण थोड्याच वेळात हे झाड बाजूला काढण्यात आले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरची दोनही दिशांची वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरात चांगला पाऊस कोसळत होता.
मुलुंड येथे सकळी बदलापूरला जाणारी स्लो लोकलवर झाडाची फांदी पडल्याने सीएसटीहुन कल्याणकडे जाणारी डाऊन मार्गाची वाहतूक काहीकाळ जलद मार्गावर वळविण्यात आली होती. त्यामुळे डाऊन मार्गावरील गाड्या एकामागे एक थांबल्या होत्या. मात्र आता दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु झाली असली तरी लोकल उशिराने धावत आहेत.
दरम्यान, मुंबईत पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अंधेरीपर्यंत जोरदार पाऊस आहे. तसेच बोरीवलीमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, जोगेश्वरी येथे उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात अपघात होऊन एक ठार तर पाच जण जखमी झालेत. जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रामा केअर हॉस्पिटलच्या विरूद्ध जोगेश्वरी उड्डान पुलावर ट्रक आणि कारच्या यांच्यात विचित्र अपघात झाला. या झालेल्या अपघातात एक ठार आणि पाचजण जखमी झालेत.