मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असतील. तर  रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक असतील. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योजक मूकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्यानंतर, तसेच स्फोटकं सापडलेल्या गाडी मालकाची हत्या आणि त्यानंतर सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यांची संशयित म्हणून या प्रकरणात अटक, यामुळे राज्याच्या गृहखात्यावर विरोधकांनी चौफेर टीकेचा भडीमार सुरु केल्यानंतर, अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे.


सचिन वाझे यांची स्फोटकं, आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी चौकशी सुरु आहे, हे प्रकरण पुढे काय वळण घेतं, यावरुन स्पष्ट होणार आहे की, राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याचा जो निर्णय घेतला होता, तो योग्य होता किंवा नाही.