मुंबई: सद रक्षणाय।खल निग्रणाय पोलिसांचं वाक्य आपण कायम ऐकतो. संकट कोणतंही असो मुंबई पोलीस कायम मदतीला धावून येतात. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी वृद्धांपासून गरजू लोकांपर्यंत खूप मदत केली आहे. पोलिसांनी अगदी घरापर्यंत वस्तू पोहोचवून दिल्या आहेत. मुंबई पोलीस कायमच मदतीसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं.


मुंबई पोलिसांनी आणखी एक यशस्वी कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. 80 वर्षांच्या आजीची हरवलेली बॅग शोधून दिली आहे. विशेष म्हणजे ही बॅग हजारो रुपयांनी भरलेली होती. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेतली.


तब्बल 11 तासांत पोलिसांनी ही बॅग शोधून काढली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे. या बॅगेत 1 लाख 55 हजार रुपयांची रक्कम होती. एवढ्या रकमेसह या आजींची बॅग पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नांनी 11 तासांत शोधून काढली आहे.   




गोरेगाव ते मालाड रिक्षाने प्रवास करताना एका ८० वर्षीय वयोवृद्ध महिलेची 1 लाख 55 हजार रक्कम असलेली पिशवी हरवली. बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या जवानांना ही माहिती मिळताच त्यांनी तपास करून ती पिशवी शोधून काढली. ही पिशवी महिलेच्या ताब्यात दिली आहे.


दुसरीकडे रविवारी चेन्नईमध्ये प्रत्येक दिवशी आपल्या कानावर चोरीच्या घटना पडत असतात. अनेकदा लोकं थोड्याशा पैशासाठी लबाडी करताना दिसतात. मात्र तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईतील एका ऑटो ड्रायव्हरने प्रवाशाला चक्क २० लाखांचे दागिने परत केले आहेत. या रिक्षा चालकाच्या इमानदारीचं सगळीकडूनच कौतुक होतं आहे.