मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन
Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या.
Mumbai News : मुंबई पोलीस पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रुमला पुन्हा एकदा आलेला धमकीचा फोन. समा नावाची महिला एका काश्मिरी तरुणीच्या संपर्कात असल्याची माहिती फोन कॉलवरुण देण्यात आली. ही दोघं मिळून मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचंही या फोनवरून लक्षात आलं. 'एटीएसचे अधिकरी मला ओळखतात पण ही माहिती मी तुम्हाला देतोय' असेही फोनवरुण संगण्यात आलं. फोन करणाऱ्या तरुणाचं नाव शोएब असल्याचं सांगण्यता येत आहे. सदर प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु केली असून, सविस्तर माहिती प्रतीक्षेत आहे.