मुंबई पोलिसांना ८ तासाची ड्युटी
मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तासच राहणार आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई पोलिसांना एक मोठी खुशखबर मिळालीये.मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तासच राहणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांनी ही घोषणा केलीये.
'मिशन ८ अवर्स'
'मिशन ८ अवर्स' या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली. गेली वर्षभर मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्टेशन मध्ये ही “ऑन ड्युटी ८ तास” संकल्पना राबवण्यात आली.
प्रयोग यशस्वी
सुरुवातीला काही अडचणीं आल्या पण त्यावर वरीष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वी झाला.
त्यानुसार मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीसांची संख्या लक्षात घेऊन आता सर्वच पोलीस स्टेशन मध्ये ही संकल्पना राबली जाणार आहे.
खाजगी आयुष्यावर परिणाम
ऑन ड्युटी २४ तास असाच समज एकंदर होता. एवढचं नाही तर गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेता. कधी १२ तर कधी २४-२४ तास पोलिसांना ड्युटी करावी लागते.
याचा परीणाम पोलीस जवानांच्या खाजगी आयुष्यवर होत होताच पण सर्वात जास्त शारिरीक आणि मानसिक नुकसान होत होते.
आता ड्युटी ८ तास केल्याने नक्कीच यात घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.