हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 हजार हिऱ्यांनी (27,000 diamonds) साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेलं बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट (Potrait) अतिशय आकर्षक  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.  ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत.  शैलेश यांनी  हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट  स्वीकारताना  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  



२७ हजार हिऱ्यांनी साकारलेलं हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला.  शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर  काम केलं आहे.  यापूर्वी त्यांनी रतन टाटा यांचं असंच पोर्ट्रेट तयार केलं होतं. उद्धव ठाकरे यांना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. 


याप्रसंगी शिवसेना नेते  संजय राऊत , विनायक राऊत,. शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , हिंगोली - नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे,  आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान  उपस्थित होते.