Mumbai Real Estate Deal: देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्ननगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत करोडो रुपयात घरांची विक्री झाल्याच्या अनेक बातम्या येत असतात. लाखातच नाही तर कोट्यवधी रुपयात अलिशान फ्लॅट विकले जातात. दक्षिण मुंबईत 18000 चौरस फुटाचा ट्रिपलेक्स फ्लॅट तब्बल 252 कोटी रुपयांना विकला गेला होता. आता मध्य मु्ंबईत दोन फ्लॅट तब्बल 100 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.  IndexTap.com दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रियाल्टीचे (Suraksha Realty) संचालक परेश पारेख आणि विजय पारेख यांनी मुंबईतल्या वरळी परिसरात 100 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे या फ्लॅटची खासियत
IndexTap.com ने दिलेल्या माहितीनुसार परेश आणि विजय पारेख यांनी वरळीतल्या श्रीनमन रेसिडेंसीमध्ये हे फ्लॅट खरेदी केले आहे. इमारतीच्या 26 व्या आणि 27 व्या मजल्यावर हे प्लॅच असून या फ्लॅटचा एरिया  6,458 वर्ग क्षेत्रपळ इतका आहे या फ्लॅटसोबत चार कार पार्किंगची जागा देण्यात आलीय. याशिवाय दोन्ही फ्लॅट्सना 640 क्षेत्रफळाची बालकनी आहे. वरळी हा भाग मुंबईतल्या अलिशान भागांपैकी एक आहे. श्रीनमन रेसिडेंसी इमारत वरळी समुद्रकिनाऱ्यासमोर असून इथे अनेक फिल्मस्टार्सही राहातात. यात शाहिद कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांचीही घर आहेत. 


घरावर इतकी ड्यूटी
सुरक्षा रियाल्टीने या दोन्ही फ्लॅटसाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय स्टॅम्प ड्यूटी म्हणून प्रत्येकी 3 कोटी रुपये भरलेत. ही विक्रमी डील 7 नोव्हेंबर 2023 रोजी झाली. 


सुरक्षा रियल्टी ने इन दोनों लग्जरी फ्लैट्स के लिए 50-50 करोड़ रुपये का शुल्क अदा किया है. वहीं इसके अलावा बतौर स्टैंप ड्यूटी 3-3 करोड़ रुपये का भुगतान किया गया है. यह डील 7 नवंबर, 2023 को हुई है.


रेखा झुनझुनवालांच्या कंपनीची कोट्यवधीची डील
दरम्यान, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या Kinnteisto LLP कंपनीने मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि चांदिवली परिसरात दोन कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या दोन्ही कार्यालयांसाठी तब्बल 740 कोटी रुपयांची डिल करण्यात आलीय. या कार्यालयांचा परिसर 1.94 लाख वर्ग क्षेत्रफळ इतका आहे. 


या शहरात विक्रमी खरेदी-विक्री
रियल इस्टेट कंपनी सीबीआरईने दिलेल्या माहितीनसार  2023 या वर्षात प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत 4 कोटीहून अधिक किंमत असलेल्या फ्लॅटच्या विक्रीत 97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात तब्बल 9,246 अलिशान घरांची विक्री झाली आहे. लक्झरी घरांच्या विक्रीत दिल्ली-एनसीआर पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर मुंबई आणि हैदराबादचा नंबर लागतो.