मुंबई : मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मुंबईमधले निर्बंध आता आणखी कडक होणार का? हे पाहावे लागेल. मुंबईतले मार्केट आणि लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. आणि त्यामुळेच कोरोनाचा प्रसात वेगाने होतोय का, अशी शंका आहे. बीड आणि नांदेडमध्ये ज्याप्रमाणे लॉकडाऊन लावण्यात आले आहे, तसेच निर्बंध आता मुंबईतही लागणार का हे पाहावे लागेल 


मुंबईतील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही घसरून ९० टक्क्यांवर आले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी जो कधीकाळी ३०० हून अधिक दिवसांवर गेलेला होता, तो आता ८४ दिवसांवर घसरलेला आहे. मुंबईत सध्या ३९ कंटेन्मेंट झोन आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या ३७ हजारावर गेली आहे. 


आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. या यादीत मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. 


गेल्या आठवड्याभरात मुंबईतील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारावरच आहे. आज त्याचाही उच्चांक गाठण्यात आला आहे. फेब्रुवारीपर्यंत मुंबईत २००-४०० च्या घरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या होती.