Mumbai मध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक राज्यांपेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा
मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. तर १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. तर १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईतील कोरोनाच्या अक्टीव्ह रुग्णांची संख्या आता 55 हजारांवर गेली आहे. केवळ मुंबईच नाही तर मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढतोय. याच शहरांमधून मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग मुंबईत येत असतो. त्यामुळे मुंबईत तूर्तास लॉकडाऊन जरी नसला, तरी उद्यापासून निर्बंध कडक करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.
मुंबईत कोण-कोणते निर्बंध लागण्याची शक्यता?
ट्रेनमधून पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता
मॉल्स, सिनेमागृहे पूर्णपणे बंद होण्याची शक्यता
हॉटेल 50% उपस्थितीने चालवले जाणार
खाजगी ऑफिसेस 2 शिफ्टमध्ये चालवण्यावर भर
दुकान आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवले जाण्याची शक्यता
मुंबईतील धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याची शक्यता
मुंबईत दररोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही 5 हजाराच्या घरात आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही 85 टक्क्यांवर घसरलेले आहे. दररोज मृतांची संख्याही 10च्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली. मात्र आता महापौरांनीच निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत.