मुंबई : शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी अटक केलेय. शाहूनगर पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीने नामांकित कंपन्यांच्या नावाने फसवणुकीचा चंग बांधला होता. आतापर्यंत ३० जणांची या टोळीने फसवणूक केल्याचेसमोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश अगरवाल आणि त्याचा मुलगा चंचल अगरवाल तथा सुरज शर्मा या दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुतवण्यास तयार असणाऱ्या लोकांना हेरले. त्यांच्याकडून पैसे उकळवून त्यांची फसवणूक करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली. हे दोघे आणि त्यांची सहकारी काजल सिंग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी इच्छुक व्यक्तींना गाठायचे आणि त्यांच्याकडून गुमंतवणुकीच्या नावाखाली पैसे काढायचे.


या तिघांनी सोशल मीडियावर जाहिराती व्हायरल केल्या. या जाहिरातून त्यांनी शेअर बाजारातीत ट्रेडिंगसाठी फुकटात डीमॅट अकाउंट उघडून देण्याचे आमिष दाखवले. मुंबईतील शाहिद नावाच्या एकाने ही सोशल मीडियावील जाहिरात पाहून तसा अर्ज केला. अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी तुमच डी मॅट अकाउंट उघडण्यात आले असून शेअर ट्रेडिंग करण्यासाठी खात्यात एक लाख रूपये भरण्यास सांगितले. 


शाहिद अन्सारी यांनी पैसे भरताच दुसऱ्या दिवशी त्यांना या दोघांनी तुमचे पैसे आम्ही शेअर बाजारात गुंतवल्याचे सांगितले. त्याचवेळी हे सगळे पैसे बुडल्याचे त्यांनी सांगितले. धास्तावलेल्या शाहिद अन्सारी यांनी डीमॅट खात्याची माहिती मागवली असता खातं बनावट असल्याचे त्यांना समजले.


दरम्यान, या दोघांच्या बॅंक खात्यातून पोलिसांनी लाखो रूपये  जप्त केले आहेत. या टोळीने बनावट खात्याच्या माध्यमातून अशाप्रकारे आणखीही लोकांना फसविल्याचे पुढे आलेय. सध्या त्याचाच तपास पोलीस करतायेत.