Mumbai News : भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांची ये-जा कायमच काही रस्स्त्यांवर सुरु असते. असाच एक रस्ता म्हणजे मुंबई- सायन- पनवेल हायवे (Sion panvel highway). या रस्त्यावर गांधी मार्केट (Gandhi Market) परिसरात नुकताच एक भीषण अपघात पाहायला मिळाला. ब्रिजखाली कंटेनर अडकल्यामुळं हा मोठा अपघात झाला. कंटेनर अडकून तो एका बाजूला कलंडला आणि यामध्ये बाजूने जाणारे बाईकस्वारही गंभीर जखमी झाले. यादरम्यान मुंबईच्या दिशेनं जाणारी एका दिशेची वाहतूकही बंद करण्यात आली होती. (Mumbai Sion road container Stuck under the bridge causing Accindent and problems to others)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Accident) अपघाताचं स्वरुप भीषण होतं, परिणामी बाईकस्वारांनी मृत्यू जवळून पाहिला हे आता स्पष्ट होत आहे. त्यांना सदर घटनेनंतर तातडीने नजीकच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 



सायन ब्रिजखाली नेहमीच कंटेनर अडकत असतात, ज्यामुळं या रस्त्यावर अनेकदा वाहतुक कोंडीची समस्या पाहायला मिळते. अशाच घटना यापूर्वीही पाहायला मिळाल्या आहेत. पण, तरीदेखील या (Bridge) ब्रिजकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय याबाबत मात्र वाहतुक पोलीस आणि सर्वसामान्यांकडून नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे.