मुंबई : एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साडेआठच्या सुमारास ती ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघाली ती कायमचीच. तिच्या घरच्यांनीही कल्पना केली नसेल की आपली लाडकी लेक आपल्याला पुन्हा दिसणार आहे. २९ सप्टेंबर हा दिवस हिलोनीसाठी काळा दिवस ठरला.


यशस्वीपणे सीएची परीक्षा पास झालेली हिलोनी अॅक्सिस बँकेत कामाला होती. एलफिन्स्टनमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत हिलोनीता हकनाक बळी गेला. या अपघाताची माहिती मिळताच हिलोनीच्या आईने केईएमजवळ राहणाऱ्या नातेवाईकांना चौकशी करण्यास सांगितले. अनेक वॉर्ड पालथे घालूनही हिलोनीचा शोध लागत नव्हता. अखेर 


हिलोनीला पोस्टमॉर्टेमला नेले असल्याचे समजताच तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या लाडक्या लेकीच्या जाण्याने घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय.