मुंबई : येथील शेअर बाजारात आजही घसरगुंडी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स पुन्हा एकदा ५०० अंकानी कोसळला. सलग ५०० हून सेन्सेक्स घसरण्याचा आज लागोपाठ तिसरा दिवस आहे. काल सेन्सेक्स पुन्हा ८००  अंकानी कोसळला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंधन विक्री करणाऱ्या सरकारी कंपन्या आणि सरकरी बँकांचे समभाग गडगडल्यानं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेनं नवं पतधोरण जाहीर केल्यानंतर सेन्सेक्स ६०० अंकांनी खाली आला. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत आणखी घसरली. एका डॉलरसाठी आता ७४ रूपये मोजावे लागणार आहेत.


दरम्यान, आज  रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसै थे ठेवण्यात आले. त्यामुळे रेपो रेट ६.५० टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ६.२५ इतकाच राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे महागाईच्या भीतीने धास्तावलेल्या सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलास मिळाला आहे. त्यामुळे काल पडलेले शेअर मार्केट आज ५०० वर आले. काल सेन्सेक्स ८००  अंकानी कोसळला होता.