मुंबई : आज मुंबापुरीला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची लाईफ लाईन असणारी रेल्वे देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. तब्बल ७ तासापासून मुंबई ठप्प झाली आहे. सेंकद सेकंदाला धावणारी मुंबई आज पूर्णपणे थांबली आहे.


मुंबईतील रस्त्यांवर देखील पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम झाला आहे. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी मुंबईत येणाऱ्या रस्त्यांना बंद करण्यात आलं आहे.