मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार ११ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या १५ दिवसात रेल्वेला मेगाब्लॉक रद्द करावा लागला. मात्र येत्या रविवारी ब्लॉक घेऊन रेल्वे रूळाची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे सीएसएमटीच्या दिशने जलद मार्गावर, हार्बर रेल्वे मार्गवर सीएसएमटी ते चुनाभट्टी- वांद्रे या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान कामे करण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


मध्य रेल्वे - 


कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद लोकल अप धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच या ब्लॉकमुळे लोकल आणि मेल, एक्स्प्रेस २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहे.


हार्बर रेल्वे -


सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर  सकाळी  ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत परिणामी वाशी-बेलापूर-पनवेलहून सुटणारी सीएसएमटी आणि वडाळा रोड लोकल,सीएसएमटीहून सुटणारी वाशी-बेलापूर-पनवेल, गोरेगाव आणि बांद्रा दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला, पनवेल स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ८ वरून पनवेलकरीता विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वे -


सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत परिणामी सांताक्रूझ ते गोरेगाव या मार्गापर्यंत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप-डाऊन जलद मार्गवरुन चालविण्यात येणार आहे. तर विलेपार्ले स्थानकावर फलाट क्रमांक ५/६ ची लांबी कमी असल्याने येथे डबल थांबा दिला जाईल.