मुंबई : या क्षणाची सर्वात मोठी बातमी (Big Breaking) समोर आली आहे. मुंबईकरांसाठी (Mumbai) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. टॅक्सी चालकांनी एकदिवसीय संपाची हाक दिली आहे. वाढीव भाडेवाढीसाठी टॅक्सी चालकांनी (Mumbai Taxi Strike) संपाचा बडगा उगारलाय. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे (Fuel Rate) टॅक्सी चालकांनी हा निर्णय घेतला आहे. (mumbai taxi strike one day strike of mumbai taxi mens union on september 15 for fare hike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील टॅक्सी चालक 15 सप्टेंबरला एक दिवसीय संप करणार आहेत. सीएनजीचे दर सातत्याने वाढतायेत. त्यामुळे पहिल्या दीड किलोमीटरसाठी 35 रुपये भाडेवाढेची टॅक्सी चालकांची मागणी आहे. 


याआधी मुंबईतील टॅक्सी चालक 1 ऑगस्टला एक दिवसाचा संप जाहीर केला होता. मात्र परिवहन विभागाने चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनामुळे हा संप मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने मागे घेतला होता.  मात्र कुठलीही सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे टॅक्सी चालकांनी 15 सप्टेंबरला संपाची हाक दिली आहे.