मुंबई : पहाटेपासून मुंबई आणि उपनगर तसेच मुंबईला लागून असेलल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, पालघर, रायगड तसेच मुंबईच्या पश्चिमेला बोरिवली, विरार, वसईतही पावसाची संततधार सुरू आहे, आणखी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.


पाहा राज्यभरातील पावसाचे LIVE UPDATE


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावलीये. रात्रभर दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली.  आज मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो. 


दादर, परळ भागातही पाऊस सुरूय. दादरच्या हिंदमाता भाग सखल परिसर असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. 


ठाणे : रात्रभर कोसळणा-या पावसामुळे ठाण्यात कळवा रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचलं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली. विटावा भागात काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं.


नवी मुंबई : पनवेल परिसरातही रात्री पासून पावसाने जोर धरलाय. त्यामुळं सखल भागात पाणी साचलंय. वाशी, तुर्भे परिसरात सखल भागात पाणी साचलंय.


कल्याण : कल्याण डोंबिवलीतही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खाडीपात्रातील पाण्यात वाढ झालीये तसंच कल्याणमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय.. 


डोंबिवली :  मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या गांधीनगर एमआयडीसी परिसरात नाला दुथडी भरून वाहतोय.  सागरली, सांगावं नांदिवली भोपर ह्या गावांमध्येही पाणी साचलंय. 


बदलापूर :  बदलापूर आणि अंबरनाथमध्ये रात्रीपासून पाऊस सुरुय. सकाळपर्यन्त तालुक्यात 163 मिमी पावसाची नोंद झालीय. तर जून महिन्यात 325 मिमी पाऊस पडलाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यन्त 71 .8 मिमी पाऊस पडला होता. 


बारवी धऱण क्षेत्रात गेल्या 24 तासात 92 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर,भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर या महापालिका आणि औद्यगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो ,मागील  वर्षी धरणात आजच्या दिवशी फक्त 9 .05 टक्के पाणी साठा उपलब्ध होता. मात्र आज 29 .86 टक्के साठा शिल्लक आहे.


पालघर :  पालघर जिल्हात रात्रभर विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पालघर, बोईसर, डहाणू, मनोर परिसरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. सूर्या नदी दूथडी भरून वाहतेय. काही भागात वीजपूरवठा खंडीत झालाय. 


वसई : वसई विरार परिसरात रात्रीपासून पाऊस पडतोय. रविवार असल्यानं रस्त्यावरही शुकशुकाट आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.  नवघर बस डेपोत पाणी साचायला सुरूवात झालीय. 


बोरिवली :  बोरिवली,  आणि कांदिवली परिसरातही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही सखल भागांमध्ये या पावसामुळे पाणी साचलंय. 


दहिसर : दहीसर आनंदनगर भागात पाणी साचणार नाही असा दावा पालिकेनं केला होता. पण परिसरात गुडघाभर पाणी जमा झालंय.  घरांमध्येही पाणी शिरलंय. पालिकेनं पाणी काढण्यासाठी लावलेल्या दोन पैकी एक पंप बंदच आहे. 


भाईंदर : भाईंदरमध्येही रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली. सखल भागात असलेल्या चाळींमध्ये रात्रीच्या पावसानं पाणी शिरलं. सध्या पावसाचा जोर मंदावलाय. 


सातारा :  सातारा, कराड, कोरेगावसह महाबळेश्वर, पाचगणी आणि कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झालीय.  पण दुष्काळी खटाव, माण तालुक्यात अजुनही शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.


रायगड : रायगडमध्ये माथेरान, कर्जत, खालापूर परिसरात पावसाने जोर धरलाय, कर्जत मार्गावर माणिकबागजवळ झाडं आडवं झाल्यानं वाहतूक वळवण्यात आलीय. पलसदरी मार्गे खालापूरला वाहतूक वळवलीय. 


अर्नाळा :   अर्नाळा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूय.  समुद्रातल्या मोठं मोठ्या लाटांमुळे समुद्र किनारी असलेल्य़ा घरांमध्ये पाणी शिरलं होतं. 


लोणावळा : लोणावळ्यात जोरदार पाऊस पडतोय.  गेल्या 24 तासांत लोणावळा शहरात १५० मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. कही भागांमध्ये पाणई साचलंय.  लोणावळा खोपोली मार्गावर बोरघाटात पावसामुळे दरड कोसळली. 
दरम्यान अपघातग्रस्तांसाठी काम करणाऱ्या सोशल मीडिया ग्रुपनं ही दरड हटवलीय. मात्र हा मार्ग धोकादायक बनलाय. 


माटुंगा : माटुंगा भागातल्या किंगसर्कल भागातही रात्रभराच्या पावसानं पाणी साचलं होतं. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यानं परिसरातलं पाणी थोडं ओसरलंय. 


 


 


 


ठाणे - विटावा परिसरात काही घरात पाणी साचलं #MumbaiRains #Thane #Kalyan 


पालघरमध्येही मुसळधार पाऊस #rains #palghar


वसई तालुक्यात २४ तासात ४६ मिली मीटर पाऊस #rains #vasai


मुंबई पूर्व उपनगरात २४ तासात ७३ मिली मीटर पावसाची नोंद  #MumbaiRains #Thane


महाबळेश्वर पाचगणीत मुसळधार पाऊस #Rains #Mahabaleshwar


कळवा-मुंब्रा दरम्यान रेल्वे रूळावर पावसाचं पाणी #MumbaiRains  #Thane #Kalva


ट्रान्स हार्बरचीही वाहतूक विस्कळीत  #MumbaiRains  #Thane #Kalva


नवी मुंबईतही पावसाची संततधार #MumbaiRains  #Thane #NaviMumbai