नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता अर्ध्या किमतीत; NMMT कडून प्रवाशांना खास भेट, काय आहेत नवे तिकीट दर?
Navi Mumbai- Mumbai via Atal Setu : बातमी तुमच्या कामाची, आता नवी मुंबई ते मुंबई प्रवास खिशाला परवडणाऱ्या दरात. पाहा कसा मिळेल फायदा, काय आहेत नवे तिकीट दर...
Navi Mumbai- Mumbai via Atal Setu : अटल सेतूकडे वाहनांनी पाठ फिरवल्याची आकडेवारी समोर आलेली असतानाच आता याच अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं शक्य होणार आहे. यामागचं कारण ठरतंय ते म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागानं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय.
NMMT च्या वतीनं नुकतेच नवी मुंबई- मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50 टक्क्यांनी घट केली आहे. मागील आठवड्यापासून ही कपात लागू झाली असून, सदर प्रवासमार्गावर प्रसासीसंख्या वाढवण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयानंतर आता खारघर- मंत्रालय या अटल सेतूनवरून जाणाऱ्या बर प्रवासासाठी 270 ऐवजी 120 रुपये इतक्याच दराचं तिकीट काढावं लागणार आहे. नेरूळ ते मंत्रालय या प्रवासासाठीचं बसभाडं 230 वरून 105 रुपयांवर आणलं गेलं आहे.
मागील वर्षीच सप्टेंबर महिन्यात नवी मुंबई ते मंत्रालय या मार्गासाठी दोन बससेवा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, सुरुवातीलाच इथं तिकीटदरांनी सामान्य प्रवाशांना धडकी भरवली आणि या मार्गाकडे त्यांनी पाठ फिरवली होती. आता मात्र तिकीटदरात मोठी कपात लागू करण्यात आल्यानं प्रवासी पुन्हा एकदा या मार्गावरील बससेवेला पसंती देताना दिसत आहेत. ्ट
अटल सेतूला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद?
दरम्यान समुद्रावर बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून 2024 या वर्षात अपेक्षेपेक्षा वाहतूक अपेक्षेहून मोठ्या फरकानं कमी झाल्याची बाब निदर्शनास आली. 13 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर या काळात अटल सेतूवरून 7980553 वाहनांनी प्रवास केला.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : थंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याच (एमएमआरडीए) प्रसिद्धी पत्रकातून यासंदर्भातील माहिती देत दर दिवसी इथून सरासरी 22607 वाहनं प्रवास करत असल्याचं स्पष्ट केलं. प्रत्यक्षात मात्र हा आकडा 39 हजार अपेक्षित असल्यानं वर्षभरातील एकूण वाहनसंख्या 42 टक्क्यांनी कमी असल्याचं इथं लक्षात आलं.