मुंबई : Mumbai Vaccination : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरणाला (COVID-19 vaccination) सुरुवात झाली झाली आहे. काल राज्याला 21 लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा प्रत्येक केंद्रावर वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईकर लसीकरणासाठी जाऊ शकतात. (Mumbai to resume COVID-19 vaccination today after a two-day break)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीच्या डोसच्या कमतरतेमुळे दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत शनिवारी (21 ऑगस्ट, 2021) महापालिकेने आपली कोविड -19 लसीकरण मोहीम पुन्हा सुरू केली आहे. गुरुवारी रात्री 1,60,000 पेक्षा जास्त डोस मिळाल्यानंतर शहरात कोरोनाव्हायरस लस देणे सुरु झाले आहे. ही लस शुक्रवारी सर्व सरकारी आणि नगरपालिका लसीकरण केंद्रांमध्ये वितरित आली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या मते, कोविशील्डचे 1,50,000 डोस आणि कोवॅक्सिनचे 10,240 डोस मिळाले आहेत. बीएमसीने मुंबईतील कोविड लसीकरण केंद्रांची (सीव्हीसी) यादी शेअर केली आहे  यानुसार शनिवारी लस देण्यात येणार आहे.



दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 4,365 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी मुंबईत 322 संक्रमणाची नोंद झाली आहे. राजधानीची सक्रिय संख्या आता 2,853 झाली आहे, तर राज्यात ती 55,454 आहे.