Mumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील `या`आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील `या`आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Mumbai Metro 3 Trial Run Exclusive Video : भारतात रेल्वेचे (Indian Railways) मोठं जाळ पसरलं आहे. त्यात मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य रोजचा प्रवासही हा रेल्वेवर अवलंबून आहे. मुंबईकरांसाठी लोकल (Mumbai Local) ही श्वास आहे. हा श्वास जेव्हा थांबा तेव्हा मुंबई थांबते. कोरोना महासंकटात लॉकडाऊनमध्ये लोकल बंद केली होती. तेव्हा जणू काही मुंबईने श्वासच घेणं सोडलं होतं असं जाणवतं होतं. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा, यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुणेपाठोपाठ (Pune Metro) आता मुंबईकरांना भुयारी मेट्रोचा आनंद लुटता येणार आहे.
पुढचं स्टेशन..! (next station)
लोकलमधून प्रवास करताना साधी लोकल असो किंवा एसी लोकल (AC Local) त्यात प्रवाशांना उत्सुकता असते ती म्हणजे पुढचं स्टेशन कुठलं हे जाणून घ्यायची. त्यामुळे प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी लोकलमध्ये घोषणा होते अगला स्टेशन...पुढचं स्टेशन...मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro) भुयारी मार्गावर कुठले स्टेशन आहेत, हे प्रत्येक मुंबईकरांना माहिती असले पाहिजे. कारण कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गावर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या ठिकाण आणि मुंबईची जान शिवाय ओळख असलेल्या दादर स्टेशन (Dadar Station) चा समावेश आहे.
हेसुद्धा वाचा - Pune Metro : कसा आहे भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा प्रवास, पाहा Video
हे स्टेशन पण येणार
मेट्रोच्या दादर स्थानकाशिवाय सिद्धिविनायक (Siddhivinayak), काळबादेवी (Kalbadevi), चर्चगेट (Churchgate) आणि हुतात्मा चौक हे स्टेशन असणार आहे. सिद्धिविनायक स्थानकाचे काम 85 टक्के झाले आहेत. या मेट्रोमुळे उत्तर मुंबई गाठण्यासाठी मुंबईकरांना मोठी मदत होणार आहे. दादर स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ट्रकचे काम 100 टक्के झालं आहे. पण मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईकरांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या साडेतेहसीस किमीच्या भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या चाचपणीची एक्स्क्लुझिव्ह झलक झी 24 तासने कॅमेरात कैद केली आहे. त्यामुळे नेमकी भूयारी मार्गातून मेट्रो कशी धावणार आहे, याची झलक तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.