Mumbai University BA Result :  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध सत्रांच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून निकाल पाहता येत आहेत. दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए  सत्र 6 या महत्वाच्या परीक्षेचा निकाल काल रात्री जाहीर केला आहे. या परीक्षेत 4 हजार 675 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी49.31 एवढी आहे. परीक्षांचे निकाल उशीरा लागणे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मनस्ताप होणे, यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर टीका केली जाते. पण विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच  मानव्य विद्याशाखेचा निकालही 30 दिवसाच्या आत जाहीर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परीक्षेत 13 हजार 301 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर  12 हजार 697 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 4 हजार 675 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर  4 हजार 806  विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल 49.31 टक्के एवढा लागला आहे. 604 विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. 45 विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर  2 हजार 243 विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित (Confirm) न झाल्यान 928  विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.


मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. याला सर्व प्राध्यापक व  प्राचार्यांचे सहकार्य मिळाले. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, सल्लागार डॉ. प्रसाद कारंडे व मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाते यांनी विशेष लक्ष दिले. कॅप विभाग, निकाल कक्ष व सीसीएफ मधील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर निकाल जाहीर करण्यासाठी परिश्रम घेतले. 


एकही निकाल राखीव नाही 


या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर आणि ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. 


विद्यापीठाने आजपर्यंत 2024 च्या उन्हाळी सत्राचे 74 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. 


अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा