Mumbai University Result: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या अंतिम वर्षाच्या एप्रिल 2023 मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष  बीएमएस सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमएस सत्र 6 च्या परीक्षेमध्ये एकूण 8110 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 15 हजार 516 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 हजार 346 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर 170 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 3200 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएमएस सत्र 6 चा निकाल 71.71 टक्के लागला आहे. 


विद्यापीठाने आजपर्यंत 2023 च्या उन्हाळी सत्राचे 86 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.



बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर


 शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष  बीकॉम फिनान्सियल मार्केटस ( बीएफएम ) सत्र ६ व ५ वर्षीय विधी शाखेच्या सत्र १० या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.


बीएफएम सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण ६५६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ३०० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २३४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएफएम सत्र ६ चा निकाल ७३.७१ टक्के लागला आहे. 


विधी शाखेच्या सत्र १० च्या परीक्षेमध्ये एकूण ८०६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ५४४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर १४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ५७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. लॉ सत्र १० चा निकाल ५८.४१ टक्के लागला आहे. 


आयडॉलच्या प्रवेशांना 15 जुलैपर्यंत मुदतवाढ 


मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. संस्थेकडून जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 30 जून 2023 पर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत 15 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आजपर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात 7 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.