Mumbai Univeristy: अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या परीक्षा `या` दिवशी
Mumbai University Exam: दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Mumbai University Exam: पावसाच्या रेड अलर्टमुळे दिनांक २७ जुलै २०२३ रोजी होणाऱ्या १५ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या परीक्षा दिनांक १, ५, ८ व ११ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
तृतीय वर्ष बीए सत्र ५ (3A00145 ), एमए सत्र १ (सीबीसीजीएस ) ( 3A00521), एमए सत्र १ (चॉईस बेस) (3A00531), एमकॉम सत्र ४ ( ६०:४०) (2C00554), एमएससी आयटी व एमएससी कॉम्प्युटर सायन्स (६०:४०) सत्र ४, एमएससी गणित (८०:२०) सत्र ४ (1S01154), एमसीए सत्र ३ ( 1T 00163) यांच्या परीक्षा ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
तसेच द्वितीय वर्ष बीबीए/ एलएलबी ( ५ वर्षीय कोर्स ) सत्र ३ व ४ ( प्रोग्राम क्रमांक 3L00413 & 3L00414) ही परीक्षा दिनांक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
एमए / एमएससी & एमएससी रिसर्च सत्र १ ( प्रोग्राम क्रमांक 3A00521, 3A00531, 1S01111, 1S01121) ची परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.
अशा आशयाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे.
आयडॉलच्या प्रवेशास मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.आजपर्यंत या सत्रात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात १२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु
यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.
पदवीस्तरावरील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी
आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.