मुंबई : मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठानं लॉ आणि सीएसच्या ज्या परीक्षा एकत्र येत होत्या त्या पुढे ढकलल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


लॉ ची आणि सीएसची परीक्षा पुढे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा गोंधळानं विद्यापीठातील विद्यार्थी त्रस्त झालेत. लॉ ची परीक्षा आणि सीएसची परीक्षा एकत्र येत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यानी कालीनाच्या मुंबई विद्यापीठात महात्मा फुले भवना बाहेर आंदोलन केलं. यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. 


उप कुलसचिव दीपक वसावे यांची घोषणा


विद्यार्थ्याचे आंदोलन सुरु असताना उप कुलसचिव दीपक वसावे यांनी ज्या परीक्षा एकत्र येत होत्या त्यात बदल करून पुढे ढकल्याचं जाहीर केलं.