मुंबई : मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी तावडे आणि कुलगुरु संजय देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. या भेटीनंतर अपेक्षित निकाल लागेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला होता. 


दरम्यान कुलगुरु संजय देशमुख यांनी याच पार्श्वभूमीवर 4 महत्त्वाच्या बैठका बोलावल्यात.