मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?
Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
Mumbai Weather Today: मुंबईकरांना यंदा ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, ला नीनामुळं ऑक्टोबरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. अशातच परतीचा पाऊसही लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये मुंबई शहरात 110.7 एमएम आणि उपनगरात 170.9 एमएम पावसाची नोंद करण्यात आली आहे.
ला नीनाला एल निनो असंही म्हणतात. एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान अचानक वाढते. त्यामुळं होणाऱ्या हवामान बदलास एल निनो असं म्हणतात. एल निनोचे वातावरण भारतीय मान्सूनसाठी पोषक आहे. त्यामुळं मुसळधार पाऊस होतो. त्यामुळं यंदा मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच एल निनो निर्माण होऊ शकतो. जर असं झालं तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर ऑक्टोबरमध्ये पाऊस होत असेल तर परतीचा पाऊस लांबणीवर पडेल. तसंच, वातावरणातही गारवा जाणवेल.
हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ते 22 सप्टेंबर रोजी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, अधूमधून कडक उनदेखील जाणवेल. 23 सप्टेंबरनंतर पावसाची तीव्रता आणखी वाढेल. रोज 30 ते 40 एमएम पाऊस होऊ शकतो. मात्र, मुसळधार पावसाचा अद्याप कोणताही संकेत देण्यात आलेला वाही. तर, ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस होऊ शकतो.
ला निनो अद्याप निर्माण झालेलं नाही. मात्र, ऑक्टोबरमध्ये तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर ऑक्टोबरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच, उकाड्यापासून बचाव होणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे सर्वाधिक तापमान 31.9 डिग्री सेल्सिअस आणि तापमान 24.4 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद करण्यात आली आहे. रात्री आद्रतेची पातळी 87 टक्क्यांवर पोहोचू शकते.
मान्सूनच्या 4 महिन्यात 2094.5 एमएम आणि उपनगरात 2318.8 एमएम पाऊस झाला होता. तर, जून ते आत्तापर्यंत शहरात 2308.8 एमएम आणि उपनगरात 2603 एमएम पाऊस झाला होता.