मुंबई: पोटची चार मुले, पती असा अनेक वर्षांचा संसार सोडून प्रियकरावर विश्वास ठेऊन महिलेने घर सोडले. पण, पुढे त्याच प्रियकराने महिलेची गळा आवळून हत्या केली. रेणू सिंह (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, पंकज जोशी (वय २७ ) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. रेणूने लग्नाचा तगादा लावल्याने पंकजने तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून फुलला प्रेमाचा भुलभुलैय्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना मुंबईतील कांदिवली परिसरातील आहे. रेणू आणि पंकज हे दोघेही एकमेकांना दुरान्वयानेही एकमेकांना ओळखत नव्हते. पण, सोशल मीडिया हा या दोघांच्या एकत्र येण्यास कारणीभूत ठरला. सोशल नेटवर्कींग साईट्सच्या माध्यमातून रेणूची पंकज जोशी नामक युवकाशी चार महिन्यांपूर्वी ओळख झाली. प्राथमिक ओळखीचे रुपांतर पुढे मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पंकज हा मूळचा नैनितालचा असून उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये त्याचा उपहारगृह आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंट डुंबले. त्यात रेणू काहीशी अधिक. पंकजला भेटण्यासाठी ती चक्क गाझियाबादला गेली. तिथे पंकजसोबत काही दिवस राहिल्यावर पुन्हा ती कांदिवलीला परतली.


'लिव्ह इन'च्या नात्याला लग्नाचा तडा


दरम्यान, ८ एप्रिलला रेणूने पुन्हा घर सोडले आणि ती पंकजला भेटायला गाझियाबादलागेली. दोघे 'लिव्ह इन'मध्ये राहू लागले. सुरूवातीचे काही काळ दोघेही प्रेमाचा आनंद उपभोगत राहिले. पण, काही दिवसांनी आपण लग्न करूया असा तगादा रेणूने पंकजकडे लवाला. रेणू लग्नाचा विषय वारंवार काढत असल्याने पंगज वैतागला. दोघांमध्ये जोरदार वाद होऊ लागला. हा वाद इतका टोकाला गेला की, एक दिवस पंकजने रेणूच्या नवऱ्याला फोन केला आणि पत्नीला घेऊन जायला सांगितले.


मृतदेहाच्या बाजूला झोपला, शेवटी पोलिसात पोहोचला


दरम्यान, गुरूवारची रात्र रेणूसाठी काळाचा घाला घालणारी ठरली. पंकज आणि रेणू यांच्यात पुन्हा वाद झाला. संतापलेल्या पंकजने रेणूला मारहाण केली. त्यामुळे रेणूनेही मग तुला खोट्या केसमध्ये अडकवीने अशी धमकी पंकजला दिली. त्यामुळे पुन्हा संतापलेल्या पंकजने रेणूचा गळा आवळला आणि तिला ठार मारले. दरम्यान, रागाच्या भरात आपण काय करून बसलो याची कल्पना पंकजला आली. अस्वस्थ झालेला पंकज रात्री उशीरपर्यंत रेणूचा मृतदेह असलेल्या खोलीत तिच्या बाजूला झोपून होता. अखेर शुक्रवारी रात्री उशीरा त्याने खोडा पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्हाची कबूली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे.