मुंबई : दोघेही तसे सुशिक्षीत. कमावते अन् समाजातील चांगल्या वर्तुळात वावरणारे. एकमेकांवर प्रेम करणारे. नवरा-बायकोत असतो तसा प्रेमाचा तीव्र ओलावा हा त्यांच्यातील नात्याचा मजबूत दुवा. त्यामुळे संसार बहरायला मुळीच वेळ लागला नाही. सगळे कसे सुरळीत. पण, दोघांच्या नात्यात अचानक अंतर पडायला लागले. तो तीच्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधासाठी दबाव टाकू लागला. आता तर त्याचे वागणे इतके बिघडलेय की तिने थेट सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकरण आहे मुंबईतील. व्यथा आहे एका संसारी स्त्रिची. जिचे आपल्या संसारावर, नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे. पण, तिला न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. कारण आहे नवऱ्याचे व्यसन. व्यसन हा अनेकांसाठी नवा विषय नाही. पण, हे व्यसन जरा अतिरेकी आणि भलतेच आहे. या महिलेच्या नवऱ्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन आहे. हा नवरा इतका पॉर्न अॅडिक्ट आहे की, तो स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसला आहे. नवऱ्याला सुधारण्याचा ती एक पत्नी म्हणून ओटोकाट प्रयत्न करते आहे. पण, वारंवार प्रयत्न करूनही ती अपयशी ठरल्याने तिने चक्क सर्वोच्च न्यायालयाकडेच दाद मागितली आहे.


भरल्या संसाराल पॉर्नचा विळखा


नवऱ्याच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीला वैतागलेल्या या महिलेने न्यायालयाकडे केलेल्या याचिकेत आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. ती म्हणते शक्य तितक्या लवकर देशातील इंटरनेटवरच्या पॉर्न साईट्स बंद करा. आमचा संसार वाचण्यास त्याची मोठी मदत होईल. माझ्या नवऱ्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन आहे. त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.


नवऱ्याच्या दबावातून अनैसर्गिक संबंध


'हिदुस्तान टाईम्स'ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या अहारी गेलाला पती आत्मविश्वास हरवून बसला असून, त्याचा त्याच्या दिनचर्येवरही परिणाम झाला आहे. तो स्वत:च्या शारिरीक गरजांकडेही दुर्लक्ष करतो. तो माझ्याशी शरीरसंबंध फारसे ठेवत नाही. पण, जर ठेवलेच तर, तो मला अनैसर्गिक संबंधांसाठी दबाव टाकतो. आता तर त्याने माझ्यावर घटस्फोट घेण्यासाठीच दबाव टाकण्यास सरूवात केली आहे. त्यामुळे माझा संसार वाचवण्यासाठी शक्य असेल तेवढ्या लवकर या पॉर्न वेबसाईट्स बंद करा जेणेकरून माझे आयुष्य वाचेल,अशी कळकळीची विनंती या महिलेने न्यायालयाला केली आहे. नवऱ्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय लग्नापूर्वीपासूनच असल्याचेही या महिलेने म्हटले आहे.