मुंबईचा गणेशोत्सव : घरबसल्या घ्या लाडक्या बाप्पाचं दर्शन
भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घरबसल्या घेता येतंय
मुंबई : यंदाचं वर्ष जागतिक रोगाच्या विळख्यात सापडले असून या कोरोनामुळे आपल्या देशाचे राज्याचे आणि मुंबईचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गणेशोत्सव देखील याच संकटकाळात आल्यानं यंदा दरवर्षीप्रमाणे गर्दी दिसत नाहीय. सार्वजनिक मंडळांनी देखील आरोग्य उत्सव साजरा केलाय. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घरबसल्या घेता यावे यासाठी मुंबईचा गणेशोत्सव या फेसबुक पेजने पुढाकार घेतलाय.
मुंबईचा गणेशोत्सवच्या फेसबुक पेज आणि युट्यूबवर राज्यातील विविध शहरांमधील मानाच्या गणपतीची आरती लाईव्ह पाहता येते. त्यामुळे कोरोना काळात भाविकांना बाप्पाचं व्हर्च्युअल दर्शन घेता येतंय. सध्या ९० गणेशोत्सव मंडळांचा डेटा या पेजकडे आहे. प्रत्येक मंडळांच्या आरतीच्या वेळेनुसार या पेजवरुन ही आरती आपल्याला पाहायला मिळते.
कोरोना काळात भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावं म्हणून 'मुंबईचा गणेशोत्सव'ने पहिल्यांदाच व्हर्चुअल बाप्पाची संकल्पना समोर आणलीय. मोबाईल एपच्या माध्यमातून देखील गणपती बाप्पाची आरती, मंडळांचे गुगल मॅप लोकेशन अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात. पेज संचालक प्रणित तेजम व अमित कोकाटे यांच्यासह ओंकार कुलपे, निखिल मोरे, अखिल सावंत, विराज जांभळे, अनिकेत पवार, सोहम आफंडकर, नयन डुंबरे आणि तेजस दळवी या टीमने ही संपूर्ण जबाबदारी संभाळलीय.