मुंबई: पालघर लोकसभा पोट निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावलीय. बैठकीत मुंबई आणि ठाण्याचे आमदार, खासदार आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाचे स्थनिक पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी तिकीट मागितलं, तर शिवसेना त्याचा नक्कीच विचार करेल असं उद्धव ठाकरेंनी कालच स्पष्ट केलंय. त्यामुळे आज वनगांच्या कुटुंबीयांना तिकीटाविषयीचा निर्णय होऊ शकतो. 


वानगा कुटुंबियांना लोकसभा तिकिट मिळण्याचे संकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा  निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. संख्याबळावर आधारित विजयाची शक्यता लक्षात घेता भाजपला तीन जागा दिल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  पण त्याचा अर्थ अघोषित युती केली असा नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. नाशिकमध्ये  शिवसेना पक्षप्रमुखांनी लोकसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतेला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी तिकीट मागितलं, तर त्यांना ते देण्यात येईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.



शिवसेनेसाठी नाणार प्रकल्प कोकणातून संपला


नाणार प्रकल्प शिवसेनेसाठी कोकणातून संपला आहे. तो सरकारने विदर्भात न्यावा. विदर्भातले आमदार तशी मागणी करत आहेत. त्याद्वारे विदर्भाचा विकास करावा असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारला केलं.