मुंबई : मुंबईत आता रुग्ण दुप्पट होण्याचा म्हणजेच डबलिंग रेट सुधारला आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा कालावधी वाढून 26 दिवस इतका झाला आहे. एम पूर्व आणि एफ उत्तर या विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50च्या वर पोहोचला आहे. तर एम पूर्वचा कालावधी 52 आणि एफ उत्तरचा कालावधी 51 इतका झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी उत्तर आणि एच पूर्वमध्ये हा कालावधी 48 आहे. तर ई विभागात रुग्ण वाढीचा कालावधी 43 आहे.


कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका


 


धारावीत आज एका दिवसांत 17 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आज धारावीत एकही मृत्यू झाला नाही. धारावीतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 2030 वर गेली आहे. आज दादरमध्ये 19 तर माहिममध्ये 13 नवे कोरोनाग्रस्त वाढले आहेत. दादरमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 505 झाली असून माहिममध्ये 743 रुग्ण संख्या झाली आहे.


देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत 55 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. सध्या मुंबईत 28 हजार 248 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 25 हजार 152 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनामुळे 2,044 जण दगावले आहेत. 


दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. 


'डॅश बोर्ड'च्या मदतीने स्मशानभूमींची माहिती ऑनलाईन


राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत