मुंबई: लोको पायलच्या सतर्कतेमुळे एक अपघात टळला आणि जीव वाचला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. कल्याण स्थानकात अचानक व्यक्ती रेल्वे रुळावर आला. त्याचा जीव वाचवण्यासाठी लोको पायलटने इमरजन्सी ब्रेक दाबला. या व्यक्तीला सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या गोंधळात व्यक्ती इंजीनखाली फसला होता. त्याला इंजीनखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण बालंबाल वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी 1 वाजता हा प्रकार घडला. या सगळ्या गोंधळात व्यक्ती इंजीनखाली फसला होता. त्याला इंजीनखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून सुटली. त्याचवेळी काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग धरला होता. रुळांवर उभ्या असणाऱ्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसच्या मोटारमनने वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र गाडी पुढे येईपर्यंत आजोबा अजिबात जागचे हालले नाहीत. 


मोटरमनने आपले सर्व कसब आणि अनुभव पणाला लावून एक्स्प्रेसचे ब्रेक दाबले. तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत इंजिनखाली पाहिले असता हे आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले आणि तातडीने रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले. 


एक्स्प्रेसचे मोटरमनने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे कौतूक होत असून कौटुंबिक वादामुळे आजोबानी रेल्वेखाली।येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.